Maharashtra News : सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मालवणमधील (Malvan) राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दुर्घटनेप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी प्रश्न उपस्थित करताना निलेश राणेंनी संशयाची सुई शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर नेली आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? असा थेट सवालच निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. दुर्घटना स्थळी वैभव नाईक 15 मिनिटांत कसे पोहोचले? असा प्रश्न विचारत निलेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि अवघ्या महाराष्ट्राच्या माना संपूर्ण जगसमोर शरमेनं झुकल्या. या प्रकरणावरुन सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच विरोधकाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केलेल्या संशयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात निलेश राणेंनी ट्वीट केलं आहे.
पुतळा कोसळल्यावर वैभव नाईक 15 मिनिटांत कसे पोहोचले? निलेश राणेंकडून संशय व्यक्त
माजी खासदार निलेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी."
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे किल्ल्यावर पाहणीसाठी आले, त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे आधीपासूनच उपस्थित होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे तिथे दाखल झाले. त्याचवेळी राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतलं. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी झाली.
पुतळा कोसळला, त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळताना तेथील स्थानिक मच्छीमारांनी पहिला होता. त्यानंतर, त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांन याबाबत माहिती दिली, तसेच घटनास्थळी दाखल होत छन्नविछीन्न अवस्थेत कोसळलेला महाराजांचा पुतळा पाहून त्यांनी स्वतःच्या मच्छीमारीसाठी आणलेल्या ताडपत्रीने तो खाली कोसळलेला पूर्ण पुतळा झाकून ठेवला. त्यांनी बोलताना सांगितलं की, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे आमच्या घरातील एक सदस्य कोसळला असं आम्हाला वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण, शिवाजी महाराजांचा पुतळ बसवल्यामुळे इथं पर्यंटकांची गर्दी वाढली होती, जगभर आमच्य राजकोटचं नाव झालं. इथं खारी हवा असल्यामुळे 2 वर्षे टिकणारं लोखंड इथं मालवणमध्ये केवळ 3 महिनेच टिकू शकते. या पुतळ्याला वापरलेलं लोखंड तसंच होतं, ते वेल्डिंग वैगेरे केलेलं होतं, त्यामुळेच हा पुतळा कोसळला. 6 टन पुतळ्याचं वजन सांभाळणारा चबुतरा अतिशय कमकुवत होता.
पाहा व्हिडीओ : Nilesh Rane on Rajkot Fort : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांचा हात? -नितेश राणे
महत्त्वाच्या इतर बातम्या :