सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट येथील पुतळा कोसळल्याची घटन घडली. या घटनेनंतर राज्यातील शिवप्रेमींनी संताप आणि दु:ख व्यक्त केलं. तर, दुसरीकडे शासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित पुतळा बनवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित घटनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असून पुतळ्याच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 कोटी जनतेची माफी मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मी 100 वेळा माफी मागायला मागेपुढे पाहाणार नाही, असे म्हटलं. मात्र, पुतळा दुर्घनटेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्याचा वेग ताशी 45 किमी असल्याने हा पुतळा कोसळल्याचे सांगितले होते. आता, याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनीही वाऱ्याच्या वेगाबाबत माहिती दिली. तसेच, पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी वापरलेल्या लोखंडी कामावरही त्यांनी भाष्य केलंय. 
 
शिवाजी महाराजांचा (Shivaji maharaj) पुतळा कोसळल्यामुळे आमच्या घरातील एक सदस्य कोसळला असं आम्हाला वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण, शिवाजी महाराजांचा पुतळ बसवल्यामुळे इथं पर्यंटकांची गर्दी वाढली होती, जगभर आमच्य राजकोटचं नाव झालं. इथं खारी हवा असल्यामुळे 2 वर्षे टिकणारं लोखंड इथं मालवणमध्ये (sindhudurg) केवळ 3 महिनेच टिकू शकते. या पुतळ्याला वापरलेलं लोखंड तसंच होतं, ते वेल्डिंग वैगेरे केलेलं होतं, त्यामुळेच हा पुतळा कोसळला. 6 टन पुतळ्याचं वजन सांभाळणारा चबुतरा अतिशय कमकुवत होता, असेही प्रत्यक्षदर्शी मच्छिमारांनी (Fisherman) सांगितलं. तसेच, माझ्या डोळ्यादेखत हा पुतळा खाली कोसळला, अतिशय दु:ख झालं. मी माझ्या 50 हजार रुपयांच्या ताडपत्री नेऊन तो खाली कोसळेला पुतळा झाकला, असेही प्रत्यक्षदर्शी मच्छिमार सुनिल खंदारे यांनी म्हटलं.  


मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळताना तेथील स्थानिक मच्छीमारांनी पहिला होता. त्यानंतर, त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांन याबाबत माहिती दिली, तसेच घटनास्थळी दाखल होत छन्नविछीन्न अवस्थेत कोसळलेला महाराजांचा पुतळा पाहून त्यांनी स्वतःच्या मच्छीमारीसाठी आणलेल्या ताडपत्रीने तो खाली कोसळलेला पूर्ण पुतळा झाकून ठेवला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वाऱ्याचा वेग मोठा नव्हता. मात्र, पुतळा बनवताना वापरण्यात आलेले धातू गंजून गेल्यामुळेच ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या पुतळ्याचं 2 महिन्यांनी ऑडिट व्हायल हवं होतं, ते झालं नाही, पुतळ्याच चबुतरा आणि पुतळ्याचं वजन याचीही तपासणी करण्यात आली नाही. मात्र, या मुद्याचं राजकारण न करता त्याठिकाणी दुसरा पुतळा उभारला जावा. त्या ठिकाणी सर्व गोष्टींचा अभ्यास करुन स्मारक उभारण्यात यावं. रोज डोळ्यादेखत दिसणारं महाराजांचं स्मारक आता पाहता येत नसल्याने दु:ख होत असल्याचंही मच्छीमारांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा


मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; इंजिनिअरला अटक