कोलकाता : भारतीय क्रिकेट विश्वाचा जगभरातील क्रिकेटमध्ये प्रभाव वाढल्याचं दिसून आलं. टीम इंडियाने नुकतेच टी-20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटचा दबदबा जगात वाढवला होता. आता, क्रिकेटच्या प्रशासकीय विश्वातही भारताने सर्वोच्च स्थान पटकावलं आहे. बीसीबीआयचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, जगभरातून जय शाह यांचं अभिनंदन केलं जात आहे. तर, देभरातील दिग्गजांकडून, राजकीय नेत्यांकडूनही जय शाह यांचं अभिनंदन केल जातंय. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय शाह यांच्याऐवजी गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलंय. जय शाह यांची आयसीसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी खोचक टोला लगावला. त्यावर, भाजप नेते आणि बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, अभिषेक बॅनर्जी यांच्या घोटाळ्याची आठवण करुन देत ममता बॅनर्जी यांना टोलाही लगावला आहे.  


जय शाह (Jay Shah) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे सुपुत्र आहेत, त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही विरोधकांनी भाजपमधील घराणेशाहीवर निशाणा साधताना अमित शाह यांना लक्ष्य केलं होतं. आता, जय शाह यांची थेट आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, जगभरातून त्यांचं अभिनंदनही केलं जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Bannerji) यांनी गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन करत टोमणा लगावला. त्यावर, भाजपनेही पटलवार केला आहे.  ''गृहमंत्रीजी तुमचं अभिनंदन! खरंच तुमचा मुलगा राजकारणी झाला नाही, पण ICC च्या चेअरमनपदी विराजमान झाला आहे. कदाचित म्हणजे हे पद राजकारण्यांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. तुमचा मुलगा खरोखरच खूप ताकदवान बनला आहे, त्यांच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते,'' असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलंय. ममता यांनी अमित शाह यांचं अभिनंदन करताना खोचक टोला लगावल्याचं दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या ट्विटरवर आशिष शेलार यांनीही धन्यवाद म्हणत जशास तसं उत्तर देत पलटवार केला आहे.  


काय म्हणाले आशिष शेलार


धन्यवाद ममता दीदी, जय शाह हे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र असतील, पण एक सक्षम प्रशासक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. गेल्या 3 वर्षात त्यांनी उत्तम व्यवस्थापनासह बीसीसीआयच्या कारभारात उत्कृष्ट कायापालट केला आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले. तसेच, फक्त तुम्हाला आठवण करुन देण्यासाठी, अभिषेक बॅनर्जी हे जन्मजात नेते होते, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, पण ते पूर्ण क्षमतेने एआयटीसी पक्षाशी संलग्न होते. अर्थात, तो प्रॉव्हिडन्सद्वारे तुमचा पुतण्या आहे, ज्याने मनी लाँड्रिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीय आणि स्वत:ला अटकेपासून वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेत आहे, असे उदाहरण देत आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, असं असलं तरी, क्रिकेटच्या कारभारावर भाष्य करण्यापेक्षा पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करणे तुमच्यासाठी चांगले होईल, असेही शेलार यांनी म्हटले. 


हेही वाचा


माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही