Rohit Pawar on DCM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, तुकाराम महाराजांच्याबद्दल बोललं गेलं, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरु आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचं हेच कर्तृत्व का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेच लोकांनी जसं तुमचं कर्तृत्व धुवून काढलं तसं विधानसभेलासुद्दा लोक तुम्हाला धडा शिकवतील असं रोहित पवार म्हणाले. इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली. 


महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत


लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथं असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब आत्मा आहेत, असे रोहित पवार म्हणाले. आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमानी आहे. त्यामुळ तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचे रोहित पवार म्हणाले. बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं होतं. यावेळी रोहित पवार बोलत होते. 


बार्शी तालुक्यात दडपशी, रोहित पवारांची नाव न घेता आमदार राजेंद्र राऊतांवर टीका


बार्शी तालुक्यात दडपशी खूप आहे. दुकान माझंच असावं, धंदा माझाच व्हावा, जमिन मीच घ्यावी, विकासाच्या कामाला वाळू माझीच हवी,  खडी माझीच हवी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा असे म्हणत रोहित पवारांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. या भागात खोट्या केसेस खूप होत आहेत. पोलिसांना मला सांगायचय की, दोन महिन्यात सामान्यांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे.  त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांवर येथील लोकप्रतिनीधींच येऊन खोट्या केसेस टाकल्या दोन महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांशी असल्याचे रोहित पवार म्हणाले.    


लाडकी बहिण योजनेची व्याप्ती वाढवायला हवी


लाडकी बहिण योजना ही योजना चुकीची नाही. पण या योजनेची व्याप्ती वाढली पाहिजे असं रोहित पवार म्हणाले. दुधाचं अनुदान अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालं नाही. दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर योजनांची व्यापी वाढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी