Maharashtra Politics : औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतलाय. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे याचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रखर शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे.


भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार


लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. ‘लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले, मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही? असं म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं. भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार आहे. ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आ


गामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीनदिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी करतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. सातत्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी काल (10 ऑगस्ट) ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात आयोजित मेळाव्यात भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याच टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून  पलटवार करत निशाणा साधला आहे. 


मनसे आक्रमक आणि ठाण्यात राडा


उद्धव ठाकरे ठाण्यात येत असतानाच आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ फेकल्याने अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. एवढं करूनही मनसे कार्यकर्ते शांत बसले नाहीत. मनसेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची सभा असलेलं ठिकाण, रंगायतन गाठलं अन् राडा सुरू केला. त्या ठिकाणचे बॅनर्स फाडले आणि जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना काय सुरू आहे हे समजायच्या आतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.  


हे ही वाचा