एक्स्प्लोर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट, आजपासून होणार सलग पाच दिवस सुनावणी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu)  यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आज त्यांच्या साक्षीने कामकाजाला सुनावणी सुरु होईल.

मुंबई :  शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case)  प्रकरणात आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल.  आजपासून सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu)  यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आज त्यांच्या साक्षीने कामकाजाला सुनावणी सुरु होईल. 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला सलग तीन दिवस आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष होणार आहे. अॅड. महेश जेठमलानी आणखी तीन दिवस  सुनील प्रभूंची उलट साक्ष घेणार आहे. सुनील प्रभूंसोबतच शिवसेना कार्यालय कर्मचांऱ्याची उलट साक्ष होणार  आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. मागील वेळी  आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. नार्वेकर यांनी म्हटले की, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले. 

आमदार अपात्रता सुनावणीचे असे आहे वेळापत्रक?

शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण सुनावणी 18 दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. 

 पुढील सुनावणी तारखा -

> 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 

> 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर 

> 11 ते 15 डिसेंबर सलग सुनावणी

> 18 ते 22  डिसेंबर सलग सुनावणी

 शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu MLA) यांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी उलट तपासणी घेतली. आजही ही उलट तपासणी सुरु आहे.  पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेतील मुद्द्यावरुन जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्या प्रश्नांना सुनील प्रभू यांनीही चाणाक्षपणे उत्तरं दिली. मग काल दुसऱ्या दिवशी व्हिपवरुन खडाजंगी झाली. महेश जेठमलानींच्या यॉर्कर्सना सुनील प्रभूंनी सिक्सर मारल्याची भावना ठाकरे गटाने व्यक्त केली. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही विधानसभेत घमासान पाहायला मिळाले . 

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime: अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
Embed widget