एक्स्प्लोर

सुषमा अंधारे म्हणतात, 'शरद पवार मेथीच्या लाडूसारखे पौष्टिक', राज ठाकरे, फडणवीसांना काय उपमा?

Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी एबीपी माझाने दिवाळीनिमित्त दिलखुलास गप्पा मारल्या.

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असे गौरवोद्गार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काढले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी एबीपी माझाने दिवाळीनिमित्त दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी राजकारणातले रॉकेट आणि शंकरपाळे कोण याबाबत दिलखूलास चर्चा केली. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, "शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली.  यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवाचाबद्दलही सांगितले. संघर्षाबद्दल सांगताना त्यांच्या आईला देखील अश्रू आणावर झाले.  

यामध्ये राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह अन्य फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची तुलना अनेक राजकारण्यांशी सुषमा अंधारे यांनी केली.  शरद पवार हे मेथीच्या लाडू सारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत. ते स्टेट फॉरवर्ड असतात. शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. मात्र गोड पदार्थ हे हानिकारक असतात असं म्हणत धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली म्हणून केला.

सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला. यावेळी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना त्यांच्या आईला देखील अश्रू आणावर झाले. सुषमा अंधारे या आपल्या कामानिमित्त पुण्यात राहतात. मात्र सणासुदीमध्ये एक ते दोन दिवस त्या परळीला येत असतात. एवढाच वेळ त्या आपल्या कुटुंबासोबत घालवतात. हे सांगताना त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. 

दिवाळीच्या फराळाच्या नेत्यांना उपमा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी नेत्यांना फटाक्यांच्या उपमा देऊन देखील आपल्या शब्दातून चांगलीच आतिषबाजी  केली. राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचं त्या म्हणाल्या. फटाक्याची लढ म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली. तर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कावळा ब्रँडच्या फटाक्यांची उपमा सुषमा अंधारे यांनी दिली.  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चलकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चलकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
NCP Devram Lande : देवराम लांडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची कठोर भूमिका; पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी घेतला लांडेंचा राजीनामा, नेमकं काय आहे प्रकरण?
देवराम लांडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची कठोर भूमिका; पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी घेतला लांडेंचा राजीनामा, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Embed widget