Gulabrao Patil Apologized: शिवसेना नेते (Shiv Sena) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालांशी केली होती. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गुलाबराव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितलीय.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांची जीभ घसरली. आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना त्यांनी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. "गेली 30 वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामुळं त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका सुरु झाली. याचपार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलंय. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांनीही गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. या भागातून मी गेल्या 30 वर्षांपासून निवडणूक येत आहे. मी कधीच हरलो नाही. काम केल्यामुळंच लोकांनी मला निवडून दिलंय. हे पाटलांनाही माहिती असल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
- Amit Shah : 'केंद्राने पेट्रोल स्वस्त केलं तर महाराष्ट्र सरकारने दारु स्वस्त केली, पुण्यातून अमित शाहांचा हल्लाबोल
- 2024 ला एकट लढू; 160 आमदार निवडून आणू, चंद्रकांत पाटलांचे वचन
- Amit Shah : राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचं महाविकास आघाडीला आव्हान