पुणे : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकट लढू आणि 160 आमदार निवडून आणत पुन्हा सरकार स्थापन करू, असं वचन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यासमोर दिले. तसेच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 120 नगरसेवक निवडून आणू असेही पाटील म्हणाले.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.


चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला
जे पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघत आहेत, त्यांच्या पक्षाचे आमदार देखील राज्यात 60 च्या पुढे गेले नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. राज्यात भाजपने 2 कोटीपेक्षा जास्त मते मिळवली आहेत असेही ते म्हणाले. तुम्ही (अमित शाह) जो बूथ संपर्क अभियानाचा कार्यक्रम दिला, त्यामुळेच आपले सारे विजय निश्चित होत गेल्याचेही पाटील म्हणाले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर देखील निशाणा लगावला. शिवेसेने गद्दारी केली असल्याचा आरोप त्यांनी लगावला. तसेच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री मागील 3 महिन्यांपासून सापडत नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील टोला लगावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.  


अमित शाह यांच्या येण्यानं भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचा खोकला जाईल असेही पाटील म्हणाले. अमित शाह हे माझे नेते नाहीत तर माझी श्रद्धा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या दिवसांच्या पुणे दौऱ्यावर (Pune) आहेत. आज अमित शाह यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाल. तसेच पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. 


महत्त्वाच्या बातम्या: