एक्स्प्लोर
शिवसेना पदाधिकाऱ्यानं तलवारीनं कापला केक
शिवसेना पदाधिकाऱ्यानं तलवारीने केक कापल्याचा प्रकार बदलापुरमध्ये समोर आला आहे. या प्रकाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले असून अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाहीये.
मुंबई : भाजप पदाधिकाऱ्याचं शस्त्रप्रकरण ताजं असतानाच आता शिवसेना पदाधिकाऱ्यानं तलवारीने केक कापल्याचा प्रकार बदलापुरमध्ये समोर आला आहे. या प्रकाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले असून अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाहीये.
राजेंद्र उर्फ राजन चव्हाण असं या बदलापूरच्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. चव्हाण हे बदलापूरचे शिवसेना उपशहरप्रमुख आहेत. नुकतेच त्यांचा वाढदिवस झाला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चव्हाण हे तलवार उंचावताना, तसंच तलवारीने केक कापताना दिसत आहेत.
या सगळ्याप्रकरणी बदलापूर पोलिसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान एकीकडे भाजप पदाधिकाऱ्याकडे शस्त्रांचा साठा सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता बदलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्याचे हे कारनामे समोर आल्यानं खळबळ माजली आहे. आता पोलीस या पदाधिकाऱ्यावर काही कारवाई करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement