Ambadas Danve : कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्वाचे आहे. लोकसभेत (Loksabha) बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेचा वापर भाजपने मराठा मतदार फोडण्यासाठी केला असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी व्यक्त केलं. मराठी मतात फूट पाडण्याचे पाप मनसेनं केलं आहे. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसत असल्याचे दानवे म्हणाले. लाडक्या बहीण भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय दिसतात. त्यांनी एवढ्या वर्षात सुपाऱ्याच घेतल्याचा टोला दानवेंनी नाव न घेता राज ठाकरेंना ( Raj Thackeray) लगावला. 


काय म्हणाले होते राज ठाकरे?


राज ठाकरे यांनी लाडकी बहीण-भाऊ यावर भाष्य केलं होतं. लाडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.


मनोज जरांगे यांच्या भूमिकेला लाख लाख शुभेच्छा


मागच्या 25 वर्षात मुंबईत पाऊस पडला की शिवसेनेवर टीका होत होती. आता तिथे दोन वर्षे शिवसेनेची सत्ता नाही ना. पुण्यात तर भाजपची सत्ता आहे. सध्या पुण्यात मुलं पोहत आहेत अशी टीका दानवेंनी भाजपवर केली. उपमुख्यमंत्री वॉर रुममध्ये जाऊन पाहतात. त्याने काय होतं? पूरस्थितीला फक्त सत्ताधारी जबाबदार आहेत असं दानवे म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी अंधारात आंदोलक यांच्याशी बैठक करायची आणि आम्हाला भूमिका स्पष्ट करा असं सांगायचं. सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू असेही दानवे म्हणाले. निवडणूक अजून लांब आहे. कोणते पक्ष काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या भूमिकेला लाख लाख त्यांना शुभेच्छा आहेत असंही दानवे म्हणाले. .


ठाकरेंमुळेच भाजप महाराष्ट्रात उभी राहिली


ठाकरेंमुळेच भाजप महाराष्ट्रात उभी राहिली. भाजपला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं. ठाकरे पिता पुत्रामुळं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. लोक अनाजी पंतांबाबत बोलतात ते खोटं नाही. आत्ताचे अनाजी पंत फडणवीस आहेत असंही दानवे म्हणाले. भाजपच्या लोकांना कोणी विचारत नाही. रावसाहेब दानवे यांनी आरोप केला होता सिल्लोड पाकिस्तान होत आहे. भाजपचे लोक रोज आंदोलन करतात सत्तार यांचे विरोधात आणि आरोप करतात. भाजपच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही असंही दानवे म्हणाले.


सत्तार दोन महिन्याचे पालकमंत्री 


माझा अब्दुल सत्तार किंवा भुमरे यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. सर्वांना समसमान निधी मिळावा अशी माझी अपेक्षा होती. विकास जनतेचा अधिकार असून त्यात तुम्ही राजकारण कसं करू शकता. यावरुन माझा आणि भुमरे यांच्यात वाद झाला. सत्तार काही खूप नाही फक्त दोन महिन्याचे पालकमंत्री आहेत. सत्तार यांना खूप कामं असतात. जिल्हाधिकाऱ्यांना दम देणे, जमिनीत  ते व्यस्थ असतात. त्यामुळं त्यांना काम करायला वेळ मिळेल का माहित नाही असा टोला दानवेंनी लगावला. शिंदे दिल्लीत जाऊन काय काय करतील हे राज्यातील भाजपच्या लोकांना कळणार नाही असेही दानवे म्हणाले.