एक्स्प्लोर

चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

Uddhav Thackeray : बुलढाण्यातील शिवसैनिकांनी (Buldhana Shiv Sena Activists)  मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मशाल हाती घेत आम्ही कायमस्वरुपी तुमच्यासोबत राहू, असा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

मुंबई :  "माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढलात. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं, असा आरोप  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर केला आहे. 

बुलढाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी (Buldhana Shiv Sena Activists)  मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मशाल हाती घेत आम्ही कायमस्वरुपी तुमच्यासोबत राहू, असा विश्वास यावेळी बुलढाण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिला. झुकेंगे नही लडेंगे, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी मातोश्रीचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. 

उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.  आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. धनुष्यबाण रामाचं होतं, त्याने रावणाला मारण्यात आलं. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जात काम करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आहे. 

उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. लकरच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून आगामी काही दिवसांमध्ये मी बुलढण्यात येणार आणि सभा घेणार असल्याची माहिती देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यात येईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.  

राजन साळवींचं कौतुक
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचं कौतुक केलं. "गद्दारांनी अनेक आमिषं दाखवली, पण राजन साळवी कोणत्याही अमिषाला बळी न पडता खंबीरपणे आपल्यासोबत आहेत. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली. पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.   

महत्वाच्या बातम्या

Bhasakar Jadhav On Narayan Rane: 'शिवसेनेने काही केले नाही, मग तू....', भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर बोचरी टीका 

महत्त्वाच्या बातम्या

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Embed widget