Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्यापेक्षा झोळीत ग्रामस्थ व साई भक्तांनी भरभरून दान दिले. यामध्ये सुमारे दीडशे पोते धान्य तर चार लाखाहून अधिक रक्कम भिक्षा झोळी द्वारे जमा झाली आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज कालच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून झाली.


शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने 4 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने झाली. आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे सव्वा पाच वाजता सुमारास काकड आरती, त्यानंतर पहाटे पावणे सहा वाजता श्रींचे मंगल स्नान व सात वाजता संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत व त्यांचे पती संजय देवरे यांच्या वतीने गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. तर समाधी मंदिरात प्रशासकीय अधिकारी संजय जोरी व त्यांची पत्नी किरण जोरी यांच्या वतीने श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता कीर्तनकार अंजली जोशी यांच्या माध्यमातून गोपाळकाल्याची कीर्तन झाले. कालच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली दुपारी सव्वा बाराच्या सुमारास साई बाबांची मध्यान आरती झाली.


देश विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांच्या पुण्यतीथी उत्सवाला शिर्डीत मोठ्या भक्तिमय वातावरण सांगता झाली. जवळपास चार दिवस हा उत्सव साजरा केला जात असतो. या निमित्त साई संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांना उपस्थितीत राहता आले नव्हते. पण यंदा कोणतेही विषाणूचे संकट नसल्यामुळे साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो लोक शिर्डीत येवू शकतात. प्रत्येक वर्षी शिर्डीतील साईबाबा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव हा विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी साजरी केली जाते. त्याला शिर्डी साईबाबा महासमाधी दिवस नावाने ओखळले जाते.


भिक्षा झोळीत भरभरून दान...
दरम्यान श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रूढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साई भक्तांनी भरभरून दान दिले. यामध्ये गहू तांदूळ व बाजरी असे सुमारे दीडशे पोते धान्य रूपाने आणि गुळ साखर व गहू आटा आदींद्वारे तीन लाख 60 हजार रुपये व रोख स्वरूपात रुपये 61 हजार 554 रुपये असे एकूण चार लाख 21 हजार 833 रुपये इतकी देणगी भिक्षा दान स्वरूपात प्राप्त झाली. तसेच उत्सव काळात सुमारे दोन लाखांहून अधिक साई भक्तांनी समाधी मंदिराचे दर्शन घेतले. तर एक लाख 95 हजार 242 लाडू प्रसाद पाकिटांचा साईभक्तांनी लाभ घेतला.