Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज (07 ऑक्टोबर 2022) 336 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID19) आढळली आहे. तर, पाच जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. याचबरोबर गेल्या 24 तासातस 574 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 79,73,154 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.15 टक्के एवढं झालं आहे. लवकरच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
गुरूवारच्या तुलनेत महाराष्ट्रातील आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात गुरुवारी 198 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, एकाचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक 80 रुग्ण मुंबईत आढळल होते. याशिवाय 328 जण कोरोनामुक्त देखील झाले. तर, 328 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती
देशातील सक्रिय रुग्णांमध्येही घट
देशातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये सातत्यानं घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 997 रुग्ण आढळले आहेत. तर, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत देशातील रुग्णसंख्या 503 नं घट पाहायला मिळत आहे. देशात गुरुवारी 2 हजार 500 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. महत्वाचं म्हणजे, मे महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली गेलीय आहे. यापूर्वी 23 मे 2022 रोजी 1 हजार 675 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
भारताचं वर्ल्ड बँकेकडून कौतुक
कोरोना महामारीच्या काळात गरीब देशांसाठी भारतानं केलेलं काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असं म्हणत वर्ल्ड बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेविड मालपास यांनी भारताचं जागतिक मंचावर कौतुक केलं आहे. ते म्हणाले की,महामारीच्या भयावह संकटामध्ये भारताने गरीब आणि गरजू लोकांसाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. यासोबतच मालपास यांनी भारताने दिलेल्या रख हस्तांतरणावरही भाष्य केले. इतर देशांनी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली. पण भारताने रोख हस्तांतरणावर लक्ष केंद्रित केलं, असंही ते म्हणाले.
हे देखील वाचा-