मुंबई : वसईत (Vasai News Update) एक धक्कादायक घटना घडली आहे. संतापलेल्या आजोबांनी भटक्या कुत्र्याला एअरगनने गोळी मारली, पण ही गोळी  रस्त्यावरील एका महिलेला लागली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.  वसईच्या गिरीज येथे आज दुपापी पावणे बारा वाजता ही धक्कादायक घटना  घडली आहे.  सरीता संदिप भाईर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर सध्या वसईमधील कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या बंगल्यातील पाळीव कुत्र्याला रस्त्यावरील भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या रागात आजोबांनी भटक्या कुत्र्यावर निशाणा लावला होता. परंतु  निशाणा चुकला आणि गोळी सरीता यांना लागली.

  


मिळालेल्या माहितीनुसार,  मायकल जॉन कुटीनो हे 72 वर्षीय आजोबा वसईच्या लेमभाट वाडी स्टॉप, गिरीज येथील माविको या बंगल्यात राहतात. त्यांच्या बंगल्यातील पाळीव कुत्र्याला तेथील भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या आजोबांनी चक्क घरातील एअर गन काढून गेटवरुन रस्त्याच्या दिशेने असलेल्या कुत्र्यावर फायर केलं. पण एअर गनची गोळी कुत्र्याला लागण्याऐवजी रस्त्यावरुन जाणाऱ्या सरीता भाईर या महिलेच्या मांडीला लागली.  यात तिला गंभीर दुखापत झाली असून, तिला उपचारासाठी नजीकच्या कार्डिनल रुग्णालयात  भर्ती करण्यात आलं आहे.  ही घटना आज दुपारी पावणे बाराच्या दरम्यान घडली आहे.  


सरीता घरकाम करणारी महिला असून  ती दुपारी बंगल्याच्या येथून  आपल्या सायकलवरुन कामावर जात होती. त्यावेळीच कुटीनो यांनी केलेल्या फायरिंगमध्ये त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर वसई पोलिसांनी  मायकल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  


एअर गनचं आजोबाकडे लायसन्स नव्हतं. त्यामुळे त्याबाबत कोणती कलमे लावली जावीत, तसेच भटक्या कुत्र्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोणती कलमे लावावीत याबाबत, विधी विभागाकडून कायदेशीर सल्ला घेवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याणराव वर्पे यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेची पोलिस सखोर चौकशी करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या  


Crime: पत्नी गर्भवती असताना नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा; संतापलेल्या बायकोकडून मैत्रिणींच्या मदतीनं नवरा आणि त्याच्या प्रेयसीची हत्या 


मैत्रीत दगा! इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरुन वाद, भावाच्या मदतीनं रचला मित्राला संपवण्याचा कट