एक्स्प्लोर

तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, ड्रेसकोड फलकाचा वाद चिघळण्याची शक्यता

साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत (shirdi sai baba) भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता फलकावरून वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी संस्थान ने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली आहे.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संस्थान ने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. यामुळे आता शिर्डी ग्रामस्थ विरुद्ध तृप्ती देसाई या नव्या वादाच्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साई संस्थानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून आम्ही आवाहन केलं असून सक्ती नाही यावर ते ठाम आहेत.

साई मंदिरात दर्शन करायला येताना भारतीय पोशाखात यावं अथवा सबाह्य कपडे घालावे असं आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात दोन दिवसापूर्वी लावले आहेत. हा निर्णय खूप पूर्वीचा असला तरी केवळ फलक लावल्यानं आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असं काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतलाय.

एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे.

एकीकडे फलकावरून वाद सुरु असताना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साई दर्शन घेतले असून हा निर्णय सक्तीचा नसून आवाहन असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भक्तांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं आवाहन करत एक प्रकारे समर्थनचं केलं आहे.

याबाबत साई संस्थानच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ही सक्ती नसून आवाहन असल्याचं सांगितलं असून भाविकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर असे आवाहनचे फलक लावले असल्याचं स्प्ष्ट केलं आहे. मात्र तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाबाबत काही बोलण्यास साई संस्थानच्या वतीनं नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Repo Rate: गृहकर्जाचा हप्ता वाढणार,ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढण्याचा अंदाज, कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता
गृहकर्जाचा हप्ता वाढणार,रेपो रेट वाढल्यास गृह कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,RBI च्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
Embed widget