Shirdi Saibaba Mandir Updates: महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) नियुक्त केलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानाच्या (Shirdi Sai Baba Mandir) विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे.  साईसंस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत विश्वस्त मंडळाला मोठा झटका दिला आहे. साईबाबा संस्थान राजकीय विश्वस्तांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 


हायकोर्टानं दिलेला बरखास्तीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.  सरकारने नवीन विश्वस्त नेमताना राजकीय नसावे अशा सुप्रीम कोर्टानं सूचना दिल्या आहेत.  एक महिन्यात सरकारला विश्वस्त नेमणूक संदर्भात म्हणणे मांडण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. शिर्डीतील याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भात याचिका दाखल  केली होती. अॅड सतिष तळेकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहिले.


सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासन आणि प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली


सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासन आणि प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे.  शिर्डी संस्थान संदर्भातला दोन याचिका दाखल झाल्या आहेत.  आशुतोष काळे आणि इतर पाच जणांनी नियुक्त मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती रद्द केली त्या संदर्भात याचिका दाखल केली होती. 


सगळ्या मंदिरात ट्रस्टींच्या नियुक्त्या बदद्ल नियमावली करण्याची गरज आहे. त्या संदर्भात आज नोटीस जारी केली आहे. राजकीय लोकांच्या भरतीला सर्वोच्च न्यायालयानं नापसंती दर्शवली आहे.  भारतातल्या सर्व मंदिरातल्या नियुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्वाची टिपण्णी केली आहे. नियुक्त्या संदर्भात नियमावलींची गरज असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. 


राज्य सरकारने 16 सप्टेंबर 2021 रोजी शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ जाहीर केलं केलं होतं. या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 12 जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर करण्यात आलं होतं.  


असं होतं 12 जणांचं विश्वस्त मंडळ 
आमदार आशुतोष काळे (अध्यक्ष)
जगदीश परीश्चंद्र सावंत (उपाध्यक्ष)
अनुराधा गोविंदराव आदीक
सुहास जनार्दन आहेर
अविनाश अप्पासाहेब दंडवते
सचिन रंगराव गुजर
राहुल नारायण कणाल
सुरेश गोरक्षनाथ वाबळे
जयंतराव पुंडलिकराव जाधव
महेंद्र गणपतराव शेळके
एकनाथ भागचंद गोंदकर
अध्यक्ष शिर्डी नगर पंचायत