शिर्डी अवघ्या सव्वा रुपयात सर्वधर्मीयांचा सामूहिक विवाह सोहळा साईंच्या शिर्डीत पार पडला. महत्त्वाचं म्हणजे तब्बल 41 जोडपी यावेळी विवाहबंधनात अडकली.

 

या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. कारण या लग्नात भव्य मंडपही होता, जेवणावळीही आणि आतिषबाजीही झाली. मात्र वधू वरांना खर्च आला, फक्त सव्वा रुपया..

 

थाटात लग्न लागलं फक्त सव्वा रुपयात. सव्वा रुपया म्हटल्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पण साई सिद्धी चॅरिटेबल ट्स्टचे कैलास कोते आणि नागरिकांच्या मदतीतून सामूहिक विवाह सोहळा गेल्या 15 वर्षांपासून सुरु आहे. नुकतीच 41 जोडपी विवाह बंधनात अडकली.

 

साई सिद्धी चॅरिटेबल ट्स्टने आतापर्यंत 1500 लग्न लावल्याचं कैलास कोते यांनी सांगितलं.

 

सर्व धर्माची जोडपी भव्य मंडपात एकत्र आली. त्याच्या पाहुण्यांचीही सोय करण्यात आली. प्रत्येक जोडप्याचं लग्न त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार अगदी विधीवत पद्धतीनं लावण्यात आलं..

 

विशेष म्हणजे नवविवाहित जोडप्यांच्या अपत्यांचीही काळजी करत, मुलगी जन्माला आल्यास 5 हजारांचं फिक्स डिपॉझिटही करण्यात येणार आहे.

 

सध्या राज्यात भीषण दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही...मात्र यंदाही साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डीतल्या ग्रामस्थांनी सामाजिक भान जपलंय. म्हणूनच ग्रामीण भागातील तरुण, तरुणींचं लग्न पार पडलं. तेही थाटात. लग्नात अगदी भव्य मंडप, जेवणावळी..आणि आतिषबाजीही..

VIDEO: