एक्स्प्लोर
उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच शिर्डी-हैदराबाद विमान रद्द
लगेजसंदर्भात प्रवाशांमध्ये झालेला घोळ आणि अपुऱ्या प्रकाशामुळे विमानाचं उड्डाण रद्द केल्याची माहिती मिळते आहे.

शिर्डी : मुंबई-शिर्डी विमानसेवा सुरु होऊन अवघा एक दिवस झाला आहे. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द झालं आहे. लगेजसंदर्भात प्रवाशांमध्ये झालेला घोळ आणि अपुऱ्या प्रकाशामुळे विमानाचं उड्डाण रद्द केल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल मोठ्या दिमाखात मुंबई-शिर्डी विमानसेवेचं उद्घाटन झालं होतं. काल पहिल्या विमानाचं मुंबईहून-शिर्डी उड्डाण झालं. त्यानंतर दुपारी शिर्डीहून हैदराबादकडेदेखील विमानाचं उड्डाण झालं. मात्र, आज दुसऱ्या दिवशी हे विमान शिर्डीहून हैदराबादकडे रवाना होऊ शकलं नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























