एक्स्प्लोर

शरद पवार माढ्यातून लढणार, मोहिते पाटलांचा पत्ता कट?

पुण्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले आहे की, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू असे त्यांना सांगितले, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

पुणे : मागील वेळेस राज्यसभेत गेलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू  असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पुण्यात बोलताना  शरद पवार यांनी सांगितले आहे की, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू असे त्यांना सांगितले, असे शरद पवारांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या इच्छुकांची चाचपणी सुरु केली आहे. राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघांबाबत पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरु आहे. यात माढा, जळगाव, शिरुर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. माढा लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार याचं चित्र आजच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता होती. माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी द्यायची यावर खल सुरु होता. यात आता शरद पवारांनी नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. आज खासकरून माढा , जळगाव, शिरूर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली.  या बैठकीला शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत. दरम्यान, माढा लोकसभेसह आघाडीमध्ये पक्षाकडे असणाऱ्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा केली असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget