एक्स्प्लोर

अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करुन राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप केला होता. त्याबद्दलची काही माहिती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. यादरम्यान पडद्यामागे अनेक अशा घटना घडल्या, ज्याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. त्यापैकी काही गोष्टींचा खुलासा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी केला आहे. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले. शिवसेनेने सुरुवातीला भाजपसोबतची तीस वर्षांपासूनची युती तोडली. त्यामुळे राज्यातला सर्वात मोठा पक्ष असूनही भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला. तसे त्यांनी राज्यपालांना कळवले होते. त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याच्या तयारीत होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेदेखील त्यास अनुकूल होते. परंतु त्याचदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपला जाऊन मिळाले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला. 23 नोव्हेंबर रोजी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा राजकीय भूकंप पाहिल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला होता की, अजित पवारंनी भाजपसोबत युती का केली? या राजकीय भूकंपाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत. दरम्यान यावेळी शरद पवार यांनी स्वतःची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, लोकांना असे वाटते की, मला याची पूर्ण कल्पना असेल, किंवा अजित पवारांच्या या अशा कृतीला माझा पाठिंबा असेल. परंतु हे साफ चुकीचं आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पवार म्हणाले की, सुरुवातीच्या वेळी मला अजित पवारांनी एकच गोष्ट सांगितली होती. अजित पवार एके दिवशी मला म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलायचं म्हणतात. मी जाऊ का?" राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, या भूमिकेतून मी अजित पवारांना फडणवीसांशी बोलण्यासाठी होकार दिला. परंतु दुसऱ्या दिवशी असं काही घडेल, याची मला कल्पना नव्हती. शरद पवार यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी शपथविधी पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं. परंतु त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की, आपलं सरकार किती एफिशियंट आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल हे सगळे किती जोमाने काम करतात, हे पाहिलं. सकाळी सहा वाजता हे सगळं घडतंय, हे पाहून माझा विश्वासच बसत नव्हता. शरद पवार म्हणाले की, शपथविधीला जे लोक उपस्थित होते त्यातले काही चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक असे आहेत जे मी म्हणेन तेच करतील. हे माझे लोक आहेत. त्यामुळे हे जे काही घडलंय आणि घडतंय ते मी सुधारु शकतो, याचा मला विश्वास बसला. वाचा : शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार 80 तास आणि शरद पवारांचा पॉवर प्ले! | ABP Majha VIDEO पाहा : वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम  अजित पवार म्हणतात मी बंड केलं नव्हतं

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget