मुंबई : एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा प्रश्न फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी दिले.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरुन ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी आज मुंबईत शरद पवारांची  भेट घेऊन चर्चा केली.

https://twitter.com/PawarSpeaks/status/919155504722599936

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात जी व्यक्ती सध्या ओएसडी म्हणून कार्यरत आहे, ती व्यक्ती अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात काय चालतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.

सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

नोटीस मिळालेले युवक:

  1. आशिष मेटे , औरंगाबाद

  2. मानस पगार , नाशिक

  3. विकास गोडगे , उस्मानाबाद

  4. शंकर बहिरट , पुणे

  5. योगेश वगाज , सोलापूर

  6. श्रेणिक नरदे , कोल्हापूर

  7. सचिन कुंभार , सांगली

  8. ब्रम्हा चट्टे, सोलापूर


इतर तरुण :

  1. डॉ. अमर जाधव

  2. मल्हार टाकळे

  3. योगेश बनकर

  4. आकाश चटके

  5. राहुल आहेर

  6. योगेश गावंडे

  7. इम्रान शेख

  8. शरद पवार

  9. अमित देसाई

  10. धीरज वीर

  11. भाऊसाहेब टरमले

  12. मयुर अंधारे

  13. अक्षय वळसे

  14. अक्षय गवळी

  15. प्रदिप तांबे

  16. विकास मेंगाणे

  17. विकास जाधव