नागपूर:  शरद पवार (Sharad Pawar)  यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं, त्यांच्या पक्षात व कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर (Yashwant Manohar)  यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस (Sharad Pawar Birthday)  आहे. ते नागपुरात दाखल झाले असून त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भविष्यात  राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत, असे म्हणत शरद पवारांचे कौतुक केले आहे.  


शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं. शरद पवारांच्या पक्षात आणि कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे.  त्या प्रश्नांना बाजूला सारून फक्त राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात भाजपला हरवण्यासाठी बहुजनांना एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी शरद पवारांना दिला आहे. जरी भविष्यात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर लक्ष घालाव अशी अपेक्षा मनोहर यांनी व्यक्त केली 


भाजपला देश पातळीवर पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावे


भाजपला देश पातळीवर पराभूत करण्यासाठी 26 पक्षांच्या आघाडीला एकत्रित ठेवण्याच्या प्रयत्नाकडे पवारांनी लक्ष घालावं असे ही मनोहर म्हणाले. देशभरातील बहुतांशी बहुजनांना त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्यावर विश्वास आहे. देशातील बहुतांशी पक्षही त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे शरद पवार यांनी इंडिया आघाडीला मजबूत करावं असे मनोहर म्हणाले. 


शरद पवारांचा आज 83 वा वाढदिवस


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज 83 वा वाढदिवस आहे. आज ते नागपूरात आहेत. नागपुरात ते  ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहरांकडे गेले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. 


शरद पवारांवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव


शरद पवारांवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना भावनिक शुभेच्छा दिल्या आहेत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


हे ही वाचा :


Sharad Pawar Birthday: 'साहेबांना शुभेच्छा देताना संकोच वाटला', अजित पवार गटातील नेत्याची खंत