एक्स्प्लोर

Sharad Pawar Resigns : दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार, पण.... ; शरद पवारांचा निर्णय अजित पवारांनी सांगितला...

Sharad Pawar Retirement: शरद पवारांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचं सांगितलं. पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. 

'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर यावेळी भावूक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर ठिय्या मांडला आणि शरद पवारांच्या राजीनाम्याला विरोध केला. 

शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. 

काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश सांगितला. ते म्हणाले की, "आम्ही शरद पवार साहेबांसोबत बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर पवार साहेबांनी दोन-तीन दिवसात यावर विचार करतो असं सांगितलं. पण कार्यकर्ते उपाशी राहून आंदोलन करत आहेत हे त्यांच्या मनाला पटलं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी घरी जावं असं त्यांनी सांगितलं. जर कार्यकर्त्यांनी इथेच थांबण्याचा हट्ट केला तर मात्र आपण निर्णय बदलणार नाही असं पवार साहेबांनी सांगितलं आहे."

काय म्हणाले शरद पवार?

अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी नव्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. या समितीमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांंचा समावेश आहे. ते अध्यक्षपदाचा निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षासाठी उपलब्ध असेन असं आश्वासनही त्यांनी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget