Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा; शरद पवारांच्या बहीण सरोज पवार यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar Resigns: शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून मात्र विरोध, निर्णय मागे घेण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 May 2023 05:45 PM
Sharad Pawar Resigns: राजीनामा सत्र थांबवण्याचं शरद पवारांचं आवाहन

कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर शरद पवार निर्णय बदलणार नाही - अजित पवार


राजीनामा सत्र थांबवण्याचंही शरद पवारांचं आवाहन

Sharad Pawar Resigns: शरद पवारांना निर्णयाबद्दल विचार करायला दोन ते तीन दिवस हवे

पवार साहेब असं बोलतील याची कोणाला कल्पना नव्हती - अजित पवार


शरद पवारांना निर्णयाबद्दल विचार करायला दोन ते तीन दिवस लागतील - अजित पवार

पक्षाचे मुख्य अधिकार पवारांकडेच राहणार - सूत्र

'राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्याध्यक्षाची नियुक्ती करावी'


'पवारांकडे सूत्र राहतील पण पक्षाचं कामकाज कार्याध्यक्ष पाहिल'


शरद पवारांसोबतच्या बैठकीत काही नेत्यांचं मत

Sharad Pawar Resigns LIVE : सिल्वर ओकवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली. 

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्वर ओकवरील बैठक संपली असून भुजबळ, अजित पवार सिल्वर ओकवरुन निघाले आहेत. 

Sharad Pawar Resigns LIVE : अडीच तासांपासून वाय.बी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या

 Sharad Pawar Resigns LIVE :शरद पवारांच्या घोषणेनंतर कार्यक्रम आक्रमक झाले असून जो पर्यंत शरद पवार भूमिका घेत नाहीत तोपर्यंत इथून बाजूला न होण्याचा कार्यकर्त्यांनी पवित्रा घेतला आहे.  

Sharad Pawar Resigns LIVE : उध्दव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना होण्याची शक्यता 

Sharad Pawar Resigns LIVE : ठाकरे गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झाल्यानंतर आता उध्दव ठाकरे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी रवाना होण्याची शक्यता आहे. 

Sharad Pawar Resigns LIVE : छगन भुजबळ सिल्वर ओकवर दाखल

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. तसेच सिल्वर ओक बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

Sharad Pawar Resigns LIVE : दिलीप वळसे-पाटील सिल्वर ओकवर दाखल

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप वळसे-पाटील तसेच शेखर निकम सिल्वर ओकवर दाखल झाले आहे. 

Sharad Pawar Resigns LIVE : वाय.बी चव्हाण बाहेर पोलीसांचा ताफा 

Sharad Pawar Resigns LIVE : वाय.बी चव्हाण सेंटरबाहेर  कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु असल्याने पोलीसांचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. 

शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्ही देखील राजीनामाा पाठवू : रवींद्र भैय्या पाटील
राष्ट्रवादीचे नेते तसेच सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता जळगावतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं असून  शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू  असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांच्या निर्णयाचे मोठे दुःख आहे. देशात आणि राज्यात मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असं भावनिक आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्ते यांच्यावतीने शरद पवार यांना आवाहन करण्यात आला आहे

 
Sharad Pawar Resigns LIVE : सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न

 Sharad Pawar Resigns LIVE :  यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु असून उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा सुप्रिया सुळे प्रयत्न करत आहेत. 

Suhas Kande: शरद पवारांची महाराष्ट्राला गरज : सुहास कांदे

Suhas Kande: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतांना शिवसेना ( शिंदे गट ) आ.सुहास कांदे यांनी शरद पवार यांनी निवृत्ती घेवू नये, महाराष्ट्राला आपली गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या नेत्यांची थोड्याच वेळात शरद पवार यांच्या सोबत बैठक

Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या नेत्यांची थोड्याच वेळात शरद पवार यांच्या सोबत बैठक झाली. शरद पवार यांच्या भूमिकेवर  चर्चा होणार आहे.  सिल्व्हर ओक वरती बैठकीला थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे 

Sharad pawar: वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या

Sharad pawar: वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या


'शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा' कार्यकर्त्यांची मागणी

Sharad Pawar Resigns LIVE शवंतराव चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकीनंतर अअजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न

Sharad Pawar Resigns LIVE : यशवंतराव चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली असून त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.  

Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा; शरद पवारांच्या बहीण सरोज पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या बहीण आणि दिवंगत नेते एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करत त्यांनी राजीनाम्याला विरोध केला आहे. 

Sharad pawar:  राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संपली

Sharad pawar:  राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संपली  

Sharad Pawar Resigns LIVE :शरद पवारांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे नेते रवाना, सुभाष देसाई,अनिल देसाई शरद पवारांच्या भेटीला

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे नेते रवाना, सुभाष देसाई,अनिल देसाई शरद पवारांच्या भेटीला

 Sharad Pawar:  धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचा  राजीनामा

 Sharad Pawar:  शरद पवारांच्या घोषणेनंतर धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी  राजीनामा दिला आहे
 

Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा; शरद पवारांच्या बहीण सरोज पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या बहीण आणि दिवंगत नेते एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करत त्यांनी राजीनाम्याला विरोध केला आहे. 

Sharad Pawar Resigns LIVE : रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला

Sharad Pawar Resigns LIVE : रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला,  भेटीसाठी रोहित पवार सिल्वर ओकवर पोहचले

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवार सिल्वर ओकला रवाना, रस्त्यावर आडवे पडून कार्यकर्त्यांचा पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न 

Sharad Pawar Resigns LIVE : वाय बी सेंटरमधून शरद पवार आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना, रस्त्यावर आडवे पडून कार्यकर्त्यांचा पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न 

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांना घरी जाऊ द्या, 4 किंवा 5 वाजता सिल्वर ओकवर जाऊ आणि तुमच्या मनाप्रमाणे मार्ग काढू : अजित पवार

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवार यांना घरी जाऊ द्या. आम्ही त्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 4 किंवा 5 वाजता सिल्व्हर ओकला परत जातो. तुमच्या मनासारखा मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. 

Sharad Pawar Resigns LIVE: साहेब निर्णय मागे घेणार नाहीत, एकट्या अजित पवारांचा वेगळा सूर

Sharad Pawar Resigns LIVE: "पवार साहेबच कुटुंब प्रमुख, वयाचा विचार करुनच हा निर्णय घेण्यात आलाय. नवीन होणारा अध्यक्ष पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालीच काम करेल, पवार साहेब निर्णय मागे घेणार नाहीत"; अजित पवारांकडून स्पष्टीकरण.


कार्यकर्ते, नेते भावूक मात्र एकट्या अजित पवारांचाच वेगळा सूर, राज्याच्या राजकारणात वेगळी चर्चा 

Sharad Pawar Resigns LIVE: भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला; संजय राऊतांचं ट्वीट 

Sharad Pawar Resigns LIVE: भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला; संजय राऊतांचं ट्वीट 





Sharad Pawar Resigns: संघटनेबाबत पुढं काय करायचं? पवारांनी सांगितलं...

Sharad Pawar Resigns: शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संघटनेबाबत पुढं काय करायचं? याबाबत मी एक समिती नेमणार असून ते सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो, असं ते म्हणाले होतो.


समितीत कोणते सदस्य असणार? 



  • श्री. प्रफुल्ल पटेल

  • श्री सुनील तटकरे

  • श्री केके शर्मा

  • श्री. पी. सी. चाको

  • श्री अजित पवार

  • श्री. जयंत पाटील

  • श्रीमती सुप्रिया सुळे

  • श्री. छगन भुजबळ

  • श्री. दिलीप वळसे पाटील

  • श्री. अनील देशमुख

  • श्री. राजेश टोपे

  • श्री. जितेंद्र आव्हाड

  • श्री हसन मुश्रीफ

  • श्री धनजय मुंडे

  • श्री जयदेव गायकवाड


इतर सदस्य श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा राष्ट्रवादी महिला कांग्रेस श्री धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कु. सोनिया दूहन अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची विचारधारा ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar:  मी केवळ पदावरून बाजूला होत आहे. मी तुमच्या सोबत आहे : शरद पवार

Sharad Pawar:  मी केवळ पदावरून बाजूला होत आहे. मी तुमच्या सोबत आहे : शरद पवार

Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: "1 मे 1960 ते 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, कुठंतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे, माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.", असं शरद पवार म्हणाले. 



Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: आपण एकत्र काम करणारं आहोत. मी केवळ पदावरून बाजूला होतोय : शरद पवार

Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: "मी स्पष्ट केलं आहे की, आपण एकत्र काम करणारं आहोत. मी केवळ पदावरून बाजूला होतं आहे. मी तुमच्या सोबतच आहे.", असं शरद पवारांनी पुन्हा स्पष्ट केलं. 

Sharad Pawar Resigns LIVE : निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Resigns LIVE : "24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे," असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच "मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं. 

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिनखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं

Buldhana News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिनखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने.


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई औरंगाबाद नागपूर महामार्ग रोखला.


बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष नाझेर काजी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा.


जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने.


पवार साहेब निर्णय मागे घ्या...! देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो..! अशा घोषणा देत कार्यकर्ते उतरले आहेत रस्त्यावर 

Sharad Pawar Retires : निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, जयंत पाटील यांना अश्रू अनावर

Sharad Pawar Retires : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले. मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आपापल्या जागेवर बसण्याचं आवाहन केलं. परंतु कोणीही मंचावरुन खाली उतरण्यास नकार देत तिथेच ठाण मांडून बसले. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Sharad Pawar Resigns LIVE: सर्वांची विनंती मान्य करा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं शरद पवारांना आवाहन 

Sharad Pawar Resigns LIVE: सर्वांची विनंती मान्य करा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं शरद पवारांना आवाहन 

Jayan Patil On Sharad Pawar Resigns: तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्व थांबतो; भरल्या डोळ्यांनी निर्णय मागे घेण्याचं जयंत पाटलांचं पवारांना आवाहन

Jayan Patil On Sharad Pawar Resigns: "आज राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्याच नावानं ओळखला जातो. त्यामुळे त्यांनी अचनाक असा निर्णय घेण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. मी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजुनही इथून पुढं पाहिजे. तुम्ही आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या, तुम्ही पक्ष नव्या लोकांच्या हातात द्या. पण तुम्ही पक्षाच्या प्रमुख पदावरुन बाजूला जाणं हे कोणाच्याच हिताचं नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्व थांबतो." राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी निर्णय मागे घेण्याची पवारांना विनंती 

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा : प्रफुल्ल पाटील

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा : प्रफुल्ल पाटील

Sharad Pawar Resigns LIVE Updates: मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो : शरद पवार

Sharad Pawar Resigns LIVE Updates: शरद पवारांनी 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 


शरद पवार म्हणाले की, "संघटनेच्या बाबत पुढं काय करायचं याबाबत मी एक समिती करणार असून यात सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्याने निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो." 

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होणार, नवा अध्यक्ष कोण हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं : शरद पवार

Sharad Pawar Resigns: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होणार' शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य, तर नवा अध्यक्ष कोण हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं, पवारांच्या सूचना.  

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार 

Sharad Pawar Resigns: कार्यकर्त्यांचा पवारांच्या निवृत्तीला विरोध, निर्णय मागे घेण्याची भावनिक साद

Sharad Pawar Resigns: शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी मात्र विरोध केलाय. सभागृहात कार्यकर्त्यांनी शरद पवारांना भावनिक साद घालत निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं.




 

Sharad Pawar Resigns: शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय

Sharad Pawar Resigns: 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. 


 

पार्श्वभूमी

Sharad Pawar Resigns LIVE Updates: शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचं  (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही. 


"मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले. 


पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी


दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यासाठी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाय पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.


शरद पवारांचं  (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.  पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, एबीपी माझाआणि एबीपी न्युजचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75  पानं वाढवण्यात आली  आहेत.  शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.