मुंबई : मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांच्या या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीशी बंडखोरी करुन भाजपशी घरोबा केलेले अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर अॅक्टीव झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले आहे. यात त्यांनी एक धक्कादायक ट्विट केल आहे. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असे लिहिले आहे. त्यासोबच भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. या ट्वीटनंतर अनेकांच्या मनात गोंधळ सुरु झाला. अजित पवारांच्या बंडामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात तर नाही ना? अशीही शंका काहींनी व्यक्त केली. दरम्यान, अजित पवारांच्या ट्वीटला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.


काय म्हणाले शरद पवार?
"भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे." असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


अजित पवारांचे ट्वीट - 


अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश -
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच राज्यात लोकांच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, असंही अजित पवार म्हणाले आहेत. मोदी यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेही आभार मानले आहेत. यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.

संबंधित बातम्या -

30 तासानंतर अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह, तासाभरात केले 21 ट्वीट

काळजी करु नका, सरकार आपलंच येईल; पवारांसह उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास

हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना

AJit Pawar | मी राष्ट्रवादीतच आणि शरद पवारच आपले नेते - अजित पवार | ABP Majha