पहिल्या स्टेटसमध्ये त्यांनी शरद पवारांचा साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचा फोटो टाकला आहे, यात लिहिलं आहे की, हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल. त्याचसोबत यापुढे पुन्हा मजबूत संघटनेची पुनर्बांधणी करून लोकांची सेवा करू, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आदर्श नेतृत्व आहे, आम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने, मेहनतीने पुढे जाऊ असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे यांचे काही स्टेटस -
"तुम्ही जीवनात कोणावर विश्वास ठेवता?, आयुष्यात असं फसवल्याची भावना यापूर्वी कधी वाटली नाही. ज्यांना पाठिंबा दिला. प्रेम दिलं, त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काय दिलं.?' असे भावनिक स्टेट्सही त्यांनी ठेवलं होते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावाचे खूप जवळचे आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवारांची पाठराखण केली आहे.
"माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु असून हा मला अधिक मजबूत करेल. यातून प्रत्येकजण लवकर बाहेर पडेल", असंही त्यांनी लिहलयं.
"चांगले विचार नेहमी विजयी होतात, प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही, हा मार्ग अवघड असतो, मात्र तोच शाश्वत आहे".
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे -
दरम्यान, सत्तेच्या खेळात कुटुंबात फाटाफूट नको, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे...असं भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळेंनी काल केलं होतं. 'आपल्या पवार कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास राज्यातील जनतेला माहित आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये.', अशी भावनिक साद सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना घातली होती.
संबंधित बातम्या -
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर अचंबित, म्हणाले...
बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश
एक मेख अशीही...
Supriya Sule to Ajit Pawar | "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha