शरद पवार यांचा कोकण दौरा, आज रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील गावांची आज ते पाहणी करत आहेत. तर उद्या ते रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत.

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी माणगाव, म्हसळा आणि दिवेआगारची पाहणी केली. यानंतर ते श्रीवर्धनची पाहणी करणार आहेत. शरद पवार दुपारी चार वाजता श्रीवर्धन इथे आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हरिहरेश्वरची पाहणी संध्याकाळी पाच वाजता करणार आहेत.
शरद पवार यानंतर दापोलीला भेट देणार असून तिथेच ते मुक्काम करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित आहेत.
'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार आज (9 जून) रायगड आणि उद्या (10 जून) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळचा सर्वाधिक फटका बसलेल्या अलिबाग आणि आजूबाजूच्या गावांची पाहणी केली. त्यानंतर रायगड जिल्ह्याला तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटींच्या मदतीची घोषणा केली. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी मदत जाहीर करताना सांगितलं.
Sharad Pawar | शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
Before You Go
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या






















