एक्स्प्लोर

कितीही खटले दाखल करा, पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही : शरद पवार

महाराष्ट्रातील निवडणूक तरुणांनी ताब्यात घेतली आहे हे चित्र आहे. तरुणांचा दर्या आमच्या बाजूने आहे आणि संपत्तीचा डोंगर भाजपकडे आहे हा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद तरुणांमध्ये आहे तो गप्प बसणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

बारामती : ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर खटले दाखल करायची. कुठल्यातरी लोकांच्या आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत. त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना हा बारामतीकर पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं ते करा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. आज शरद पवार यांच्या प्रचाराची शेवटची सभा बारामतीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. 21 जिल्ह्यात जावून आलो. त्यावेळी तरुण पिढी माझ्यासमोर होती. पाच वर्ष भाजपचं राज्य पाहिलं. समाजातील एकही घटक समाधानी नाही. शेती कारखानदारी, कामगार अल्पसंख्यांक, कुणाच्याही हिताची जपणूक झालेली नाही असा आरोप शरद पवार यांनी केला. 'अरे तो माझाही बाप आहे, हे विसरु नका', सुप्रिया सुळेंचं उत्तर आणि एकच हशा या सरकारला पाच वर्षांत काय केलं हे विचारा. आजपर्यंत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवालही शरद पवार यांनी केला. 70 हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले. व्याज कमी केलं यांनी काय केलं. बारामतीत कारखाने आणून तरुण मुलांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. कारखाने बंद पडत आहेत याची जबाबदारी कुणाची आहे. तर ती सरकारची आहे, मात्र ही जबाबदारी सरकार घेत नसल्याने देशात आणि राज्यात बेरोजगारी वाढत आहे असेही शरद पवार म्हणाले. सत्तेचा गैरवापर करतोय त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यासाठी आपल्या माणसाच्या घड्याळावर व आघाडीच्या उमेदवाराचे बटण दाबून बदल घडवूया असे आवाहन शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील निवडणूक तरुणांनी ताब्यात घेतली आहे हे चित्र आहे.तरुणांचा दर्या आमच्या बाजूने आहे आणि संपत्तीचा डोंगर भाजपकडे आहे हा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद  तरुणांमध्ये आहे तो गप्प बसणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget