एक्स्प्लोर

शेतकऱ्याला तुटपुंज्या मदतीपेक्षा त्याच्या घामाची किंमत द्या : शरद पवार

नुकतंच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 6 हजार प्रतिवर्ष देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आली आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी हा सल्ला दिला आहे.

बारामती : सन्मान मिळाला तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये आहे, त्यामुळे तुटपुंज्या मदतीपेक्षा त्याला त्याच्या घामाला किंमत द्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नुकतंच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 6 हजार प्रतिवर्ष देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आली आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी हा सल्ला दिला आहे. आपण कृषीमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आत्महत्त्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन आम्ही 71 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे चांगले परिणाम देशासमोर आले. शेती उत्पन्न वाढण्याबरोबरच भारत हा निर्यातदार देश बनला. सन्मान मिळाला तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये असल्यानं शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत करण्याऐवजी त्यांच्या घामाला किंमत द्या असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. बारामती तालुक्यातल्या माळेगावमधील आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. त्यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला. कर्ज थकल्यानं लिलावाची नोटीस आली होती; मुलीचं लग्नही करायचं होतं. लिलाव झाला तर लग्नही रद्द होईल. या भितीपोटी यवतमाळच्या शेतकर्‍यानं आत्महत्त्या केल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं. त्यामुळंच आम्ही तातडीने दिल्लीत येवून 71 हजार कोटींच्या कर्जमाफीसह कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा योग्य परिणाम होवून शेती उत्पन्नात वाढ होण्यासह भारत हा निर्यातदार देश बनल्याचंही पवार यांनी सांगितलं.. सन्मानानं वागवलं आणि घामाची किंमत दिली तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये आहे. अर्थसंकल्पात सरकारनं 6 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात याचा हिशोब केला, तर ते पैसे दिवसाच्या चहालाही पुरणार नाही इतकी तुटपुंजी ही मदत आहे. त्यामुळे असली तुटपुंजी मदत देण्यापेक्षा आमच्या मालाची किंमत द्या, शेतीसाठी लागणारी साधनं योग्य रितीनं द्या. तरच इथला शेतकरी देशातले प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी होईल आणि तो लाचारीनं कोणाकडे पहाणार नाही. त्यासाठी शासनानं योग्य धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचे खडे बोल शरद पवार यांनी सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Jalgaon Drought: जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Embed widget