एक्स्प्लोर

सवर्णांकडून दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर : शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.   कोपर्डी प्रकरणी निघणारे मोर्चे आणि आयसिस संशयित समजून मुस्लिम तरुणांवर होणारी कारवाई अशा विविध मुद्दयांवर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.   "माझं एवढंच म्हणणं आहे कोणत्याही कायद्याचा गैरवापर करु नये आणि होत असेल तर सरकारी यंत्रणेनं त्याचा विचार करावा. अॅट्रॉसिटीबाबत माझं विधान गैरपद्धतीने दाखवलं", असं  शरद पवार म्हणाले.   अनेक प्रकरणात स्थानिक राजकीय वादातून अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवले जातात. त्यामुळे कायद्याची योग्य अंमलबजावणी होते आहे की नाही, याची जबाबदारी प्रशासनानं पार पाडावी, असं पवार म्हणाले.   याशिवाय कोपर्डी प्रकरणी निघणारे मोर्चांची सरकारनं दखल घ्यावी, असं आवाहनही पवारांनी केलं.   "महाराष्ट्रातील अनेक मोर्चात लाखो लोग सहभागी झालेत, त्यामुळं मी एवढंच म्हटलं होतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटत असेल, तर त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं. माझ्या माहितीनुसार दोन मागण्या होत्या एक मराठा समाजाला आरक्षण आणि दुसऱ्या अॅट्रॉसिटी बाबात होती. पण मी अॅट्रॉसिटी रद्द व्हावा असं म्हटलं नाही" असं शरद पवार म्हणाले.   अॅट्रॉसिटीनंतर पवारांनी आयसिस संशय़ित म्हणून सुरु असणाऱ्या कारवायांवर बोट ठेवलं. संशयित म्हणून कुणालाही तुरुंगात टाकणं, चुकीचं असल्याचा आरोप पवारांनी केला.   आर्थिक मागास मराठा मुस्लिमांना आरक्षण मिळावं राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचीही मागणी होत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादीची पूर्वीपासूनची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मिळावं, असंही पवारांनी नमूद केलं.   पवारांच्या भाषणातील मुद्दे आयसिस इस्लामविरोधी, मुस्लिम संघटनांकडूनही आयसिसचा विरोध - शरद पवार मराठवाड्यात मुस्लीम तरुणांवर सरसकट सुरु असलेली कारवाई चुकीची - शरद पवार कुठल्याही कायद्याचा गैरवापर कुणीही करु नये - शरद पवार कोपर्डी प्रकरणी निघणाऱ्या मोर्चांची दखल घेतली जावी - शरद पवार कायद्याचा गैरवापर होत असल्यास संबंधित यंत्रणांनी त्याकडे लक्ष द्यावं - शरद पवार अॅट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये, ही आमची भूमिका - शरद पवार अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावर प्रशासनानं लक्ष घालावं - शरद पवार गुन्हेगारांना जात-धर्म नसतो, तो गुन्हेगारच असतो - शरद पवार सवर्णच दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात, असेही माझ्या निदर्शनास आलंय - शरद पवार दलितांकडून अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत नाही - शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Rahul Gandhi PM Modi house: पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
Embed widget