एक्स्प्लोर

सरकारने राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करुन मराठ्यांना आरक्षण द्यावं : शरद पवार

राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.

कोल्हापूर : राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा,  धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अस्वस्थतेचं वातावरण आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापुरात शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला आहे. आजच्या युती सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर दिलेल्या वेळेत आश्वासन पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आज मराठा समाज आक्रमक झाला असल्याचंही शरद पवार म्हणालेत. आरक्षणाचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच सरकार असताना निर्णय घेतला होता. त्या काळात सरकारी भरतीमध्ये 16 टक्के जागा भरल्या गेल्या.  या निर्णयाविरोधात काही व्यक्ती कोर्टात गेल्या आणि निर्णय रद्दबातल ठरवला असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आणि नंतर ठिणगी पडली. त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील आंदोलने भडकली असा घणाघातही शरद पवारांनी केला आहे. वारीत साप सोडल्याच विधान नेत्यांनी केल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्याच्या विधानांनी आगीत तेल ओतण्याचे काम केलं म्हणून राज्यात मराठा समाजाची आंदोलने भडकली असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी शरद पवारांनी कोल्हापुरात केली आहे. “माझा पक्ष संसदेत लहान आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाण्यासाठी घटनेत दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. घटना दुरुस्तीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी आणि विनंती मी करेन” असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. राज्यात जास्त काळ अस्वस्थतेच वातावरण हितावह नाही. राज्य सरकारच्या भूमिकेविरोधातील राग या आंदोलनातून बाहेर पडत आहे. त्यामुळे सरकारने सुप्रीम कोर्टात भक्कम बाजू मांडावी अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न हा भाजपा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या बाबत आम्ही काय बोलणार? कारण नसताना  मुख्यमंत्र्याच्या जातीवर विधान करणं योग्य नाही, अस मला वाटतं असंही शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील जागा वाटपा बाबत लवकरच प्रक्रिया सुरू होईल, या बाबत काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, असं विधान लोकसभा निवडणुकीवर बोलताना शरद पवारांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget