नवी दिल्ली : भाजपाला देशाचं ऐक्य नको हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, परंतु हे आम्हाला दोन वर्षापूर्वी कळलं, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. अर्थात नेहमीप्रमाणे यावेळी भाजप निशाण्यावर होते. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक सभा, मेळावे भाषणांनी गाजवले. याच भाषणांवर आता पुस्तक आले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तकाचं प्रकाशन सोहळा वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये पार पडला. शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, डॉ. विजय केळकर, रंगनाथ पठारे यांची उपस्थिती होती


संजय राऊत म्हणाले, आम्हाला हे कळालं आहे की, भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी 1996 च्या आसपास सांगितलं.  प्रश्न विचारणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण पवार साहेबांना प्रश्न विचारलेले आवडतात. उत्तर शोधायला त्यांना आवडतात. अनेक वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे पवार यांनी सांगितलं,  हे आत्ता आम्हाला आता समजलं.


 शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.'नेमकचि बोलणें' पुस्तक नरेंद्र मोदींना पाठवलं पाहिजे. नेमके बोलणें याची फोड करून त्यांना सांगू, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र देशाला सतत विचार देत असतो. शरद पवार नेहमी देशाला विचार देत असतात, असंही राऊत म्हणाले. 


शरद पवार यांनी नेहमीच देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असे देखील राऊत या वेळी म्हणाले.



 


संबंधित बातम्या :


'शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला' : संजय राऊत  



'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा


शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो! मी म्हणालो, 'पवारसाहेब टेम्पो चालवताय की विमान?' तर म्हणाले...