एक्स्प्लोर
नालासोपारा प्रकरणी नाही, आगामी निवडणुकांच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बोलावली आहे. उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बोलावली आहे. उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सचिन अहिर सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्यामुळे निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय चर्चा या बैठकीत होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आघाडीत कोणते मित्र पक्ष येणार? त्यांना कस सामावून घेणार? कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती? याबाबत शरद पवार कोअर कमिटीत चर्चा करणार आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसाची राष्ट्रीय कार्य़कारिणी बैठक 28-29 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement