एक्स्प्लोर

शनी मंदिर सरकारच्या ताब्यात, विधेयक मंजूर

श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 विधानसभेत काल रात्री 12.30 वाजता मंजूर करण्यात आलं. सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे.

नागपूर: अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिर आता राज्य सरकारच्या ताब्यात आलं आहे.  शनी मंदिराच्या चौथऱ्यावर आता महिलाही जाऊ शकतील. कारण राज्य सरकरने विधानसभेत त्याबाबतचं विधेयक मंजूर केलं. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 विधानसभेत काल रात्री 12.30 वाजता मंजूर करण्यात आलं. सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे. देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबरच भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा स्वतंत्र कायदा असेल. शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे, मात्र तेथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने अनेकवेळा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून, सध्याच्या  विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता.  त्यामुळे सरकारने हे विधेयक आणले. शनी मंदिराचा वाद शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनीवर अभिषेक केला होता. महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडित काढत शनिदेवाला अभिषेक केला. या घटनेनंतर 7 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं. महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्याचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिने शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करुन शुद्धी करण्याचाही घाट घातला होता. मात्र 8 एप्रिल 2016 रोजी शनी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश करुन शनीदेवाचं दर्शन घेतलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर समितीने महिलांना दर्शन खुलं केलं. त्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पुष्पक केवडकर आणि प्रियांका जगताप यांनी थेट शनी चौथरा गाठला आणि शनीदेवाला पुष्पहार अर्पण करुन तेल वाहिलं. दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी महिलांना मंदिर प्रवेशासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्यावेळी 1 एप्रिल 2016 रोजी हायकोर्टाने मंदिरामध्ये महिलांना मिळणाऱ्या प्रवेशाचा मार्ग आता मोकळा करुन दिला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला आपल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या लढ्याला मोठं यश आलं होतं. "कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश बंदी केली जावू शकत नाही. असं असताना शनि शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो?" असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं. संबंधित बातम्या  मुख्यमंत्र्यांची नववर्षाची सुरुवात शनी दर्शनानं!   स्त्रीशक्तीचा विजय, अखेर महिलांचा शनी चौथऱ्यावर प्रवेश    पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget