पुणे : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी स्थानिकांनी मोर्चा काढला. वारजे माळवाडीमधील गोकुळनगर पठार परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल संध्याकाळी साडेचार वाजता घडली होती.
घरात शौचालय नसल्याने पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीला घेऊन घराजवळील झुडपात गेली होती. त्यावेळी अज्ञाताने मागून येऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित मुलगी 14 वर्षांची असून ती शालेय शिक्षण घेत आहेत.
पीडित मुलीवर वारजे माळवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षत अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.