हेडलाईन्स


--------------------

1 भारताचा पैलवान नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई, निर्दोष असल्याचा पुरावा सादर न करु शकल्यानं क्रीडा लवादाकडून कारवाई

-------------------

2 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित, सिंधूची बॅडिमिंटन महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक, कुस्तीत साक्षी मलिकला कांस्य

-------------------

3 पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न पुरस्कारानं गौरवणार, रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक जिंकल्यानं साक्षीचा होणार सन्मान

-------------------

4 मुलाच्या अंत्यविधीला गेलेल्या राजेंद्र घाडगेंना रजेचा अर्ज मागितला, भगवान सहाय यांच्या निष्ठूरतेचा आणखी एक नमुना, कर्मचाऱ्यांची निलंबनाची मागणी

----------------------

5 टेमघर धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं, श्रीनिवास आणि प्रोग्रेसिव्ह कंपनीवर गुन्हे दाखल करणार, दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार

--------------------

6 हिंदूंच्या सणासंबंधी निकाल देताना कोर्टाकडून भेदभाव का?, राज ठाकरे यांचा सवाल, कोर्टाकडे दुर्लक्ष करुन दहीहंडी उभारण्याचंही आवाहन

-----------------------

7 काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांनी तोडले अकलेचे तारे, पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख भारत व्याप्त काश्मीर असा केला, राजकीय क्षेत्रातून जोरदार टीका

--------------------

8 स्वातंत्र्यानंतर भाजपनं देशासाठी सर्वाधिक बलिदान दिलं, नवी दिल्लीत मोदींचं वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटलं

-----------------------

9 अलिबागमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ मिळवण्याची अनोखी स्पर्धा, धरमतर खाडीत 50 फुटावरून उड्या, 50 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम

---------------------

एबीपी माझा वेब टीम