Serum Institute Building Fire LIVE : कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Pune Serum Institute Building Fire LIVE Updates: देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली होती.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jan 2021 05:33 PM
अहवाल आल्यावरच कळेल की हा अपघात होता की घातपात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान कालच्या आगीमुळे झालंय. खास करुन सप्लायवरती परिणाम झालाय - अदर पुनावाला
LIVE TV : कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित, आग लागलेल्या ठिकाणापासून कोविड लस निर्मितीचं ठिकाण दूर, सीरमच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह @CMOMaharashtra @OfficeofUT #SerumInstituteFire
LIVE TV : सीरमच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह @CMOMaharashtra @OfficeofUT #SerumInstituteFire https://www.youtube.com/watch?v=6HNZGyPUEEY
LIVE TV : सीरमच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह @CMOMaharashtra @OfficeofUT #SerumInstituteFire https://www.youtube.com/watch?v=6HNZGyPUEEY
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली
सीरमच्या आगीच्या घटनेचं ऑडिट करणार, आगीबाबत उद्या अधिकारी पाहणी करणार, आगीपासून कोरोना लस सुरक्षित, पूर्ण चौकशीनंतरच आगीचं कारण स्पष्ट होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे सीरम इन्स्टिट्यूटला उद्या भेट देणार, आगीच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं उघड
मृत्युमुखी पडलेले पाचही जण मजुर म्हणून काम करत होते. दोन पुण्यातील, दोन उत्तर प्रदेशमधील आणि एक बिहारचा.

1.महेंद्र इंगळे ,
2. प्रतिक पाष्टे ,
3.बिपीन सरोज ,
4.सुशीलकुमार पांडे ,
5. रमाशंकर हरिजन
सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी म्हटलंय की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे.
पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी

पुणे :  देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली होती. दरम्यान कोविड-19 या आजारावरील कोविशील्ड या प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली आहे. 


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथे मे महिन्यापासून सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरिया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.


 



 




 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.