एक्स्प्लोर

सोनई हत्याकांड : सहा दोषींना आज शिक्षा सुनावणार

परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय सोनई हत्याकांडाचा खटला सरकारी वकिलांना चालवला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते.

नाशिक : अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील 6 दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते. प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला आहे. दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती. उज्ज्वल निकम यांचा शिक्षेवरील युक्तीवाद या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं. निकम यांनी आरोपींना मृत्यूदंडाची मागणी केली. त्यासाठी त्यांनी न्यायालयासमोर 13 मुद्दे मांडले. "आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली.  तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं.  ज्या पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे. पोलीसांना उलटी दिशा देण्याचं काम आरोपीनी केलं. आरोपींना कुठला पश्चाताप नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही.  हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती. इतकंच नाही तर तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती. याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरलं आहे, तर अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद दरम्यान, दोषी आरोपींचे वकील एस एस आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर  अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. संबंधित बातम्या : सोनई हत्याकांड: राक्षसांना मृत्यूदंड द्या, निकम यांची मागणी सोनई हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी बहुचर्चित सोनई हत्याकांडप्रकरणी 6 जण दोषी 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
Embed widget