एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत आल्यावर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ.लागू यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींनी डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, बंधू विजय लागू यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अंत्यदर्शनासाठी पुणेकरांसह लागू यांच्या चाहत्यांनी तसेच नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी लागू यांना मानवंदना देण्यात आली होती.
वैकुंठ स्मशानभूमीत आल्यावर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे,ज्येष्ठ समाजसेवकडाॕ.बाबा आढाव, माजी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सह-पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे शहर चे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर,नाट्य व चित्रपट सृष्टीतील डॉ.जब्बार पटेल, , उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, विजय केंकरे,राहुल सोलापूरकर, माधव वझे,चंद्रकांत कुलकर्णी ,नंदू माधव, सुधीर गाडगीळ, प्रसाद कांबळी, मेघराज भोसले, सुनील महाजन, पर्ण पेठे, ज्योती सुभाष, विवेक लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मराठी रंगभूमीवर नटसम्राटची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लागू यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. डॉ. लागू यांचा मुलगा अमेरिकेहून येणार असल्याने त्यांचं पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.
Shreeram Lagoo | रंगभूमीवरील नटसम्राट काळाच्या पडद्याआड | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement