एक्स्प्लोर
भाजप जिल्हाध्यक्षांना 'अच्छे दिन', ‘स्कॉर्पिओ’ची दिवाळी भेट

भोकरदन (जालना) : आगामी काळातील नगरपालिका आणि इतर महत्त्वाच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, भाजपने राज्यातील सर्व भाजप जिल्हाध्यक्षांना आणि शहर अध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देऊन खुश केले आहे.
एकूण 100 स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. सध्या 21 गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. औरंगाबादेत या मोटारींची खरेदी झाली. राजूर येथे विधिवत पूजेनंतर या मोटारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्षांकडे सोपवण्यात आल्या. प्रत्येक जिल्हाध्यक्षाने त्यांच्या नावे मोटारींची आरटीओकडे नोंदणी करायची आहे.
यापूर्वी सत्तेत असताना 1999 मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष, अन्य काही पदाधिकारी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांना सफारी, बोलेरो अशा मोटारी देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, प्रत्येक जिल्हाध्यक्षांना मोटारी दिल्या जाणार असून आजचा हा पहिला टप्पा होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
