Spider-Man : No Way Home : 'स्पाइडरमॅन : नो वे होम' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा सहावा चित्रपट ठरला आहे. सिनेमाने आतापर्यंत 1.69 अब्ज कमाई केली आहे. 'ज्युरासिक वर्ल्ड' आणि 'द लायन किंग' सिनेमालादेखील 'स्पाइडरमॅन : नो वे होम'ने मागे टाकले आहे. 'ज्युरासिक वर्ल्ड'ने 1.67 अब्ज कमाई केली होती तर 'द लायन किंग'ने 1.66 अब्ज कमाई केली होती. 


कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही 'स्पाइडरमॅन : नो वे होम' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलो आहे. या चित्रपटाने जगभरात कमाईचा नवा विक्रम केला आहे. टॉम हॉलंडच्या 'स्पायडरमॅन: नो वे होम' सिनेमाने अनेक बड्या सिनेमांना मागे टाकले असून जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहाव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.


भारतातही रेकॉर्डब्रेक कमाई
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' या चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता. या सिनेमानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तर 'स्पाइडरमॅन : नो वे होम' या चित्रपटाने भारतात सुमारे 212 कोटींची कमाई केली आहे. 


'स्पायडर मॅन : नो वे होम' हा चित्रपट 16 डिसेंबरला भारतात प्रदर्शित झाला असून यूएस थिएटरमध्ये हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. जॉन वॉट्सने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे स्पायडर मॅनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जात आहेत. या सिनेमातील टॉम हॉलंडच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


संबंधित बातम्या


Badhaai Do : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो' सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल


Aditya Narayan : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच होणार बाळाचं आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!


Gehraiyaan song Doobey : ‘गेहरांईया’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘डुबे’मध्ये दिसला दीपिकाचा बोल्ड अंदाज!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha