Jai Bhim : दाक्षिणात्य अभिनेता 'सूर्या'च्या (Suriya) 'जय भीम' सिनेमाचे प्रचंड कौतुक होत आहे. आता या सिनेमाने नवव्या 'नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022' मध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत. सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, लिजोमोल जोसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, तर 'जय भीम' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 


'जय भीम' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. 'जय भीम' या चित्रपटामध्ये  दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने (Suriya) प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच  या चित्रपटात प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.


1995 सालातल्या सत्य घटनेवर सिनेमा
जय भीम सिनेमा हा प्रादेशिक सिनेमा आहे. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतलाय. रखडलेल्या खून, दरोडा, चोरीच्या केसेस पूर्ण करण्यासाठी थेट आदिवासींना उचलायचं, पोलीस कोठडीत त्यांना मार मार मारायचं, इतकं मारायचं की ते न केलेला गुन्हाही मान्य करतील. या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा सिनेमात दाखवली आहे. 


ऑस्करच्या शर्यतीतदेखील सामील


साऊथचा सुपरस्टार आणि ‘सिंघम’ फेम अभिनेता सूर्याचा (Suriya) 2021 चा सर्वात लोकप्रिय चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) ऑस्करच्या (Oscar 2022) शर्यतीत सामील झाला आहे. ऑस्करच्या शर्यतीत उतरलेल्या 276 चित्रपटांची यादी जाहीर झाली असून, त्यात ‘जय भीम’च्या नावाचाही समावेश आहे.


संबंधित बातम्या


Major Postponed : 'मेजर' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे


Spider-Man : No Way Home ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट


Badhaai Do : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो' सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha