Reservation : आरक्षणाचा तिढा, नेमकं काय म्हणाले होते विलासराव देशमुख? सत्यजीत तांबे यांनी शेअर केला 'तो' व्हिडीओ

Satyajeet Tambe : आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe)  यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (vilasrao deshmukh) यांचा एबीपी माझाच्या एका कार्यक्रमातील एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

Continues below advertisement

Satyajeet Tambe : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यात झालेल्या घटनेनंतर राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा एबीपी माझाच्या (तेव्हाचा स्टार माझा) एका कार्यक्रमातील एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विलासराव देशमुख यांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

जेव्हा जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तेव्हा संघर्ष होतो. भविष्यात सुद्धा हा संघर्ष राहणार असल्याचे विलासराव देशमुख म्हणाले होते. त्यामुळे आर्थिक निकषावर जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत, असे विलासराव देशमुख म्हणाले होते. आज प्रत्येकजण जातीच्या शोधात आहे की, माजी जात कोणती आणि त्यातून मला सवलत कशी मिळेल. आरक्षणाच्या संदर्भात होणारा संघर्ष टाळायचा असेल तर भविष्यात आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार करावा लागेल. या संदर्भात केवळ एका राजकीय पक्षाला विचार करुन चालणार नाही, तर राष्ट्रीय पक्षांना विचार करावा लागेल, तरच आरक्षणासंदर्भातील संघर्ष आपल्याला टाळता येईल असे विलासराव देशमुख म्हणाले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित होते.

जेव्हा आरक्षणांची चर्चा होईल तेव्हा विलासराव देशमुखांच्या भाषणाची आठवण येईल

आरक्षणासंर्भातील संघर्ष जर टाळायचा असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल, याबाबत दिवंगत विलासराव देशमुख यांनी आपलं मत मांडले होते. या संदर्भातील व्हिडीओ सत्यजीत तांबे यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सत्यजीत तांबे म्हणाले की, जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या या भाषणाची लोकांना आठवण येईल.

जालन्यातील घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी आंदोलने

सद्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी अरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील होत आहे.

हेही वाचा

आरक्षण वादावर विलासरावांचा तोडगा, अभिनेता रितेश देशमुखकडून वडिलांचा व्हिडीओ शेअर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola