नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण भागांमध्ये सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलाय. आज (मंगळवारी) पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हा पुरस्कार स्वीकारतील.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरे आणि इतर संस्थांची स्पर्धा घेतल्या गेल्या. यावेळी केंद्र सरकारने प्रथमच ग्रामीण भागासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण केलं. यात विविध निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा देशात सर्वप्रथम ठरलाय.
हागणदारी मुक्त गाव योजनेमध्ये सातारा जिल्ह्याने अधिक चांगली कामगिरी करून दाखवली होती. याशिवाय ग्रामीण भागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवलं गेलं. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन देण्यासारखे अनेक प्रयोग प्रशासनाच्या वतीने राबवले गेले. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून संपूर्ण देशभरातून साताऱ्याने प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळावला अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.
या उपक्रमांमध्ये लोकांची ही साथ महत्त्वाची होती. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही जिल्ह्यांने पहिल्यापासून सरस कामगिरी दाखवली असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलं.
साताऱ्याला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हयाचा बहुमान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2018 09:15 AM (IST)
केंद्र सरकारने प्रथमच ग्रामीण भागासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण केलं. यात विविध निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा देशात सर्वप्रथम ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -