एक्स्प्लोर
सतीश माथुर राज्याचे नवे पोलिस महासंचालक

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली. सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सतीश माथुर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांची नियुक्ती झाली होती. याआधी त्यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती. महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी डिसेंबरमध्ये राज्याच्या महासंचालकपदी वर्णी लागण्याआधी प्रवीण दीक्षितसुद्धा लाचलुपत प्रतिबंधक विभागाचेच महासंचालक होते.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















