एक्स्प्लोर

‘त्या’ संघर्षकन्येचं पालकत्व आमदार सतीश चव्हाण स्वीकारणार

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ऊसतोड कामगार शेतकरी सखाराम कदम यांच्या मुलींना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मदतीचा हात दिला आहे. सखाराम कदम यांची मुलगी पल्लवी कदम हिच्या शिक्षणाच्या संघर्षाची कहाणी नुकतीच एबीपी माझाने दाखवली होती. त्याची दखल घेऊन आज (5 मार्च) सतीश चव्हाण यांनी धोंडराई येथे पल्लवी आणि तिच्या दोन बहिणींची भेट घेतली. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. पल्लवी आणि तिच्या बहिणींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही महाविद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल, असं सतीश चव्हाण यांनी सांगितलं. पल्लवी कदमची संघर्ष कहाणी उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने दर वर्षी मराठवाड्यातील हजारो शेतकरी ऊसतोडणीसाठी जातात. परिणामी त्यांच्या मुलांनाही त्यांच्यासोबत शाळा सोडून जावं लागतं. मात्र अशा परिस्थितीत बीडच्या धोंडराई गावची पल्लवी कदम आपल्या दोन लहान बहिणींसोबत शिक्षणासाठी परिस्थितीशी दोन हात करते. पल्लवी आपल्या आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी न जाता दोन लहान बहिणींसोबत गावातच राहते. तिला शिकून डॉक्टर व्हायचं आहे. म्हणून तिचा आणि तिच्या बहिणींचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी ती सुट्टीच्या दिवशी शेतात मोल मजुरी करते. पाच ते सहा महिन्यांच्या काळात पल्लवी तिच्या दोन बहिणींची जबाबदारी अगदी हिंमतीने पार पाडते. सातवीत शिकणारी पल्लवी शाळेतही तेवढीच हुशार आहे. पल्लवीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या शाळेतील शिक्षक तिला नेहमी मदतीचा हात पुढे करतात. शाळेत होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ती तेवढ्याच उमेदीने सहभागी होते. तिच्या मैत्रिणीही तिला अभ्यासात मदत करतात. पल्लवीला एकूण चार बहिणी आहेत, त्यापैकी एकीचं लग्न झालंय तर दोन शाळेत शिकत आहेत. एक लहान बहिण आणि तिचा भाऊ हे आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी जातात. पण पल्लवी एकटीच राहून आपल्या दोन बहिणींसोबत शिक्षण पूर्ण करण्यासाठी परिस्थितीचा सामना करते. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाकडून हंगामी वसतीगृह चालवली जातात. मात्र ती अगदी तोडक्या स्वरूपात आहेत. त्यामुळे पल्लवीसारख्या होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या जिद्दीला बळ मिळालं, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातला कोयता जाऊन लेखणी आल्याशिवाय राहणार नाही. पाहा व्हिडिओ : मराठवाड्याची संघर्षकन्या... पल्लवी कदम!

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget