एक्स्प्लोर

भानामती करा, लिंबू बांधा, मी कोणाला घाबरत नाही, सतेज पाटलांनी ठणकावलं

'आमचं ठरलं आहे, कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.' अशा शब्दात भानामतीसारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या विरोधकांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी फटकारलं

कोल्हापूर : तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा, मला काही फरक पडत नाही, अशा शब्दात कोल्हापुरातील काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी विरोधकांना ठणकावलं. 'लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे भानामती आमच्या घराकडे येऊ लागली आहे. तुम्ही भानामती करा, लिंबू बांधा, किंवा दुसरं काही पण करा, मला काही फरक पडत नाही आणि मी त्याला घाबरत पण नाही.' असं सतेज पाटील म्हणाले. 'आमचं ठरलं आहे, कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.' असंही सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरातील कसबा बावडा भागातील यशवंत निवास या सतेज पाटलांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. झुडपात पांढऱ्या कपड्यात काळी बाहुली बांधून त्याला हळदी कुंकू लावण्यात आलं होतं. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत, तोच मंगळवारी अमावस्येच्या मध्यरात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आली. खरं तर भानामती वगैरे अंधश्रद्धेचा प्रकार आहे. मात्र स्थानिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या या प्रकारांमुळे सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओ पाहा निवडणुकांच्या तोंडावर काळ्या जादू सारख्या अघोरी आणि अंधश्रद्धांचा वापर कोल्हापूर जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीच्या अनेक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा वापर काही उमेदवारांनी केल्याचं यापूर्वी मानलं जात होतं. आमदार सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात वजनदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. मंगळवारी रात्री त्यांच्या घराबाहेर घडलेल्या या भानामतीच्या प्रकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget