एक्स्प्लोर

सातारकरांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी अभूतपूर्व युती, दोन्ही 'राजें'चं एकत्रित शक्तीप्रदर्शन

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे भाऊ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही कधी एकत्र दिसत नाहीत. दोघांमध्ये अनेक राजकीय आणि वैयक्तिक वाद आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही राजेंमधले वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे भाऊ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही कधी एकत्र दिसत नाहीत. दोघांमध्ये अनेक राजकीय आणि वैयक्तिक वाद आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्ही राजेंमधले वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांनादेखील यश आले नाही. परंतु आज सातारकरांनी एक अभूतपूर्व युती पाहिली. साताऱ्याच्या दोन्ही राजेंनी आगामी निवडणुकीसाठी (विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक) मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांना भाजपकडून सातारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तर उदयनराजे भाजपच्या तिकीटावर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढत आहेत. त्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांनी आज सातारा येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु तत्पूर्वी सातारा शहरात दोन्ही राजेंनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. उदयनराजे भोसले स्वतः शिवेंद्रराजेंच्या वाड्यावर त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली. यावेळी दोन्ही राजेंच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आर.पी.आय. चे नेते अशोक गायकवाड उपस्थित होते. शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओ पाहा दोन्ही राजेंनी एकत्रितपणे काढलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, दोन्ही राजेंचे समर्थक सहभागी झाले होते. दोन्ही राजे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवेंद्रराजेंच्या वाड्याबाहेर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना मिठी मारली तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ...म्हणून उदयनराजेंविरोधात नेहमी मिशीवाला उमेदवार निवडणूक लढवतो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? New UpdateTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा: 23 August 2024HC on Mumbai Band : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही- हायकोर्टाचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Embed widget