एक्स्प्लोर

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू, साताऱ्यातील महिंदमधील घटना

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद गावात ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने महिंद गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातारा : गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद गावात ही घटना घडली आहे. काल घराच्या छतावर खेळत असताना ही घटना घडली. शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. शेजल आठ वर्षाची तर अनुष्का अकरा वर्षाची आहे. गांधील माशांच्या या हल्ल्यात आणखी दोन मुलींसह दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेने महिंद गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार महिंद गावात घराच्या छतावर खेळत असताना या मुलींवर गांधील माशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या शेजल यादव आणि अनुष्का यादव यांचा मृत्यू झाला. या दोन मुलींसह आणखी दोन मुली घराच्या छतावर खेळत होत्या. त्याच वेळी माकडांचा एक कळप घरांवरुन उड्या मारुन जात होता. त्याच वेळी एका माकडाचा धक्का गांधील माशांच्या पोळ्याला लागला आणि चिडलेल्या गांधील माशांनी छतावर असलेल्या मुलीवर हल्ला चढवला.

ओरडण्याचा आणि रडण्याच्या आवाजाने या मुलींच्या कुटुंबातील दोन महिला छतावर आल्या. तेव्हा त्यांनाही या गांधील माशांनी चावा घेतला. शेजल आणि अनुष्का गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपचार सुरु असताना अनुष्काचा मृत्यू झाला तर शेजलसह उर्वरीत सर्वांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले होते. शेजलला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी तळमावले या ठिकाणी नेण्यात आले. मात्र शेजलने उपचारास फारसा प्रतिसाद दिला नाही आणि तिचाही मृत्यू झाला.

या घटनेतील अनुष्का ही मुळची कराड तालुक्यातील येळगाव येथील असून लॉकडाऊनमुळे गेली चार महिन्यापासून ती नातेवाईकांकडे राहायला आली होती. तळमावले पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिक माहिती घेतली. या घटनेमुळे मात्र महिंद गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
13 कोटी नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी, साताऱ्यात विद्यार्थ्यांचा एल्गार 
13 कोटी नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी, साताऱ्यात विद्यार्थ्यांचा एल्गार 
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Lalit Modi : आयपीएलचा संस्थापक आणि पळपुटा ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
Embed widget